
कार्याध्यक्षपदी अजित पाटील; उपाध्यक्षपदी संतोष निढोरे
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक पार पडली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभाग कार्यकारिणी व पदाधिकारी पुनर्चना करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटील होते.
यावेळी अध्यक्षपदी बंडा पाटील -मतिवडे, कार्याध्यक्षपदी अजित पाटील -कुर्ली, उपाध्यक्षपदी संतोष निढोरे, सरचिटणीसपदी अमोल शेळके – यरनाळ, मीडिया प्रमुख पदी नेताजी पाटील कुर्ली तर सल्लागारपदी प्रा.डॉ. भारत पाटील व आनंद पाटील सौंदलगा यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यपदी हिंदुराव मोरे (मतिवडे),दिपक पाटील (कुर्ली), शिवाजी पाटील (कुर्ली), गणेश माळी (कुर्ली), केतन पाटील, सागर चौगुले, (कुर्ली), सचिन पाटील (कुर्ली), सुनील किरळे (निपाणी), राहुल संकपाळ (यरनाळ), भाऊसाहेब पाटील (कोगनोळी), नवनाथ पाटील (मतिवडे), विजय शिंदे (मतिवडे), अमरदीप चौगुले (अक्कोळ), अजित पाटील (मैराळ) यांची निवड करण्यात आली.
यावेळी सर्वच सदस्यांनी मनोगत व्यक्त करून व्यक्त करून कार्यकारणी मध्ये सीमाप्रश्नासाठी प्रामाणिक काम करण्याची इच्छा व्यक्त करून मराठी भाषेबाबत आपुलकी दाखवली. दादाराजे देसाई सरकार यांनी, सध्या मराठी तरुणांना व्यक्तीगत फिरून त्यांची समस्या कोणती आहे. त्यावर उपाययोजना काय केली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात सरकारी नोकरी मध्ये सीमाभागातील तरुणांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवल्या पाहिजेत. इतर ठिकाणी विखुरलेले मराठी भाषिक एकत्र आण़्यायासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी अजित पाटील, संतोष निढोरे, आनंदा रणदिवे, शिवाजी पाटील, सचिन पाटील, अमोल शेळके, नेताजी पाटील, बंडा पाटील, सौरभ केसरकर, गणेश माळी,राहुल संकपाळ, नवनाथ पाटील, हिंदुराव मोरे, विजय शिंदे, दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta