निपाणी (वार्ता) : तवंदी, अंमलझरी, गव्हाण आणि यरनाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी अंमलझरीच्या लक्ष्मीबाई आकाराम कांबळे तर उपाध्यक्षपदी यरनाळ येथील दिग्विजय निंबाळकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी नगरपालिकेचे आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी काम पाहिले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.
नूतन अध्यक्ष लक्ष्मीबाई कांबळे यांनी, सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून यापुढील काळात चारही गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. नूतन उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सचिन कौंदाडे, दादासाहेब पाटील, अभिजीत कौंदाडे, जयश्री यमकानमर्डे, संजय पाटील, संगीता पाटील, नंदा गुरव, राजेंद्र गुरव, राजेंद्र घाटगे, संगीता डावरे, सतीश कांबळे, आकाराम कांबळे, सागर मोरे, सुरज घाटगे, आनंदा कांबळे, बाळू खोत, वसंत मोरे, शिवाजी पाटील, मार्लेश पाटील, दत्ता पाटील, सुशांत बाडकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta