Wednesday , March 4 2026
Breaking News

नदीकाठावरील पीके अद्याप पाण्याखाली

Spread the love

 

कोगनोळी परिसरातील चित्र : पावसाची उघडीप
कोगनोळी : कोगनोळी सह परिसरात गेल्या दहा-बारा दिवसापासून संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन बसले होते. कधी एकदा पाऊस उघडतो याची चिंता शेतकरी वर्गासह नागरिकांना लागून राहिली होती. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.
धुवाधार पावसामुळे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पूरपरिस्थिती गंभीर होण्याची संभाव्य परिस्थिती निर्माण झाली होती. पण सध्या पावसाने उघडीप दिल्याने थोडे पाणी कमी झाले आहे.
कोगनोळीसह हंचिनाळ, सुळकूड, करनूर, वंदूर, सुळगाव आदी गावातील नदीकाठावरील ऊस, सोयाबीन, भुईमूग पीके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून पिकांना सुर्य किरण मिळत आहे. यामुळे पिकांना वातावरण उपयुक्त ठरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *