Monday , September 21 2026
Breaking News

माळी गल्लीत डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण

Spread the love

 

बेळगाव : माळी गल्ली येथील छत्रपती श्री शिवाजी युवक मंडळ आणि प्रसाद होमिओ फार्मसी यांच्या वतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांच्या हस्ते शिबिराचे लस देवून उद्घाटन करण्यात आले.

गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत माळी गल्लीतील मंडळाने सतत डेंग्यूस चिकनगुनिया लसीकरण केले आज या परिसरातील 600 हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, भाऊराव चौगुले, प्रभाकर बामणकर, कपिल खटावकर, चेतन गंगधर, परशराम वांद्रे, अनुराधा चौगुले, मनिशा काकडे, राधिका ठोकणेकर, विमल लंगरकांडे, राधिका ढाकणकर, सरिता मिरजकर, सुंदरा इतापे यांच्यासह महिला व मुले सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *