निपाणी (वार्ता) : स्काउट्स आणि गाईड्सचे ध्येय तरुणांना त्यांच्या पूर्ण शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षमतेपर्यंत पोहोच विण्यास मदत करणे हे,आहे. जेणेकरून ते जबाबदार नागरिक बनू शकतील. जे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदल घडवू शकतील हे अनुभवात्मक शिक्षणास समर्थन देते.
प्रौढांच्या देखरेखीखाली लहान गटांमध्ये सहभाग. विविध प्रगतीशील आणि प्रेरक कार्यक्रम आयोजित करताना सहभागींचे हित विचारात घेतले जाते, याबद्दलची माहिती बेळगाव मराठा मंडळ संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित तीन दिवशी स्काऊट अँड गाईडच्या देण्यात आले.
आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे भावी नागरिक म्हणून मत्यांच्या अंगी हे सर्व गुण जात असावे, या उद्देशाने हा या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला रिटायर्ड लेफ्टनंट जिल्हा ट्रेनिंग कमिशनर बी. एस. पोटे, स्काऊट गाईड जिल्हाध्यक्ष डी. बी. अत्तार, टी. बी. लोकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमांमध्ये योगा, बीपी सिक्स योगा, फ्लॅग चढविणे, फ्लॅग उतरविणे, किट इन्स्पेक्शन, फनी गेम्स सर्वधर्म प्रार्थना आणि कॅम्प फायर इत्यादी गोष्टी शिकवण्यात आल्या.
प्राचार्या स्नेहा घाटगे, स्वाती पाटील, धनश्री लोहार, अर्चना जोरापुरे, सुकुमार गोरवाडे, सुधाकर पवार, शिवानंद कुंभार तसेच शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta