निवडणुका लांबल्याने इच्छुक अस्वस्थ; नगरपालिकेचा कारभारही प्रशासकाकडेच
निपाणी (वार्ता) : मागील चार-पाच वर्षापासून वर्षापासून निपाणीतालुक्यासह जिल्ह्यातील तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकांची प्रतीक्षा सामान्य कार्यकर्त्यांना लागलेली आहे. या निवडणूका दिवसेंदिवस लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीआहे. त्यात राज्यातील सत्तांतर झाल्याने नेमके कोणाशी निष्ठावान रहावे, हा देखील प्रश्न कार्यकर्त्यांना पडत असून, कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
जिल्ह्यातील सर्वच तालुका आणि जिल्हा पंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षांपासून या निवडणुका झालेल्या नाहीत. परंतू, त्यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यानंतर या सर्व ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तशीच काहीशी परिस्थिती मार्च मध्ये कार्यकाळ संपुष्टात आलेल्या तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांची झाली. परंतू त्यानंतर कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर एप्रिल पासून प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जारी केला होता. त्याचप्रमाणे जिल्हा पंचायत सर्कल निहाय आरक्षण, सर्कलची रचना तसेच जिल्हा अध्यक्षपदाचे आरक्षण या सर्व बाबी मार्गी लावल्या होत्या. त्यामुळे अवघ्या काही दिवसात निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, चमत्कारीकरित्या पुन्हा नव्याने वार्ड रचना, प्रभाग प्रध्दतीत बदल असे विविध सुधारणासरकारने पुढे आणल्या. यानंतरही निवडणुका होणे अपेक्षीत होते. परंतु तसे काहीच घडले नसून, मोर्चेबांधणी करुन बसलेले सर्व भावी तालुका आणि जिल्हा पंचायत सदस्यांच्या ईच्छेवर पाणीच फेरले. तर आता २०२३ मधील केवळ पाच महिने शिल्लक राहिले आहेत.
——————————————————————
नगरपालिकेचा कारभार प्रशासकावर
येथील नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा कारभार संपुष्टात आला आहे. पण अजूनही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सभापती पदासाठी निवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळे नगरपालिकेचा कारभारही प्रशासकावरच सुरू आहे.
पावसाळ्यानंतरच निवडणुका…?
प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी अंतिम झाल्यावरच निवडणुका जाहीर होतात. या तीनही पातळीवर अजून कुठल्या संस्थेची तयारी सुरू असल्याने तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुका अजूनही दोन-तीन महिने होणार नसल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करू लागले आहे. आधीच प्रभागाचा अंदाज घेऊन केलेली तयारी नवीन प्रभागरचना केल्यास वाया तर जाणार नाही ना, असे प्रश्न या इच्छुकांसमोर उभे आहेत.
——————————————————————-

राजेंद्र वडर
‘गेल्या चार-पाच वर्षापासून तालुका आणि जिल्हा परिषद निवडणूका शासनाने घेतलेल्याच नाहीत. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारभार सुरू आहे. परिणामी पदाधिकारी आणि सदस्यच नसल्याने जिल्हा पंचायत तालुका पंचायत व ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या विकास निधीवर त्याचा परिणाम होत आहे. तरी प्रशासनाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी तात्काळ तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात.’
-राजेंद्र वडर, माजी जिल्हा पंचायत सदस्य, गळतगा
Belgaum Varta Belgaum Varta