निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून खडकलाट येथील काँग्रेस कार्यकर्ते व युवा उद्योजक बालाजी उर्फ रोहित राजू यादव यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, आमदार प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी, गणेश हुक्केरी, माजी आमदार वीरकुमार पाटील, काका पाटील, युवक काँग्रेस जनरल सेक्रेटरी बंटी शेळके, युवक काँग्रेस राज्य अध्यक्ष मोहम्मद नालपाड, शंभूराजे देसाई यांच्या शिफारशीनुसार सदर निवड करण्यात आली.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र यादव यांना देण्यात आले. यावेळी बोलताना रोहित यादव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्य आणि देशाच्या विकासात मोठी भूमिका काँग्रेस पक्षाने बजावली आहे. अशा पक्षात पदाधिकारी म्हणून काम करताना नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचे सोने करत पक्षाची ध्येय धोरणे आणि विकासकामे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तसेच युवा पिढीला अधिकाधिक प्रमाणात काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. याप्रसंगी महावीर मोहिते, अर्जुन नायकवडी, राजू कोटबागी, ॲड.नसलापुरे, नामदेव कांबळे, महादेव कौलापुरे, चेतन व्हनगोळ, अमृत ढोले, अवधूत गुरव, सुशांत खराडे, प्रतीक शहा, अतुल चावरेकर, प्रदीप सातवेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta