Monday , December 8 2025
Breaking News

पीओपी मूर्तींना यंदा शहराबाहेर थांबा?

Spread the love

 

पर्यावरण पूरक मूर्तींचा आग्रह; नगरपालिका अलर्ट मोडवर

निपाणी (वार्ता) : गणेश उत्सव काही महिन्यांवर असताना नगरपालिका यंदा प्लास्टर ऑफ पारस (पीओपी) मूर्तीच्या आयाती संदर्भात अलर्ट झाली आहे. पीओपी मूर्ती शहरात येणार नाहीत, याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे शहरामध्ये दाखल होणाऱ्या मूर्तीची संख्या यंदा घटण्याची शक्यता आहे. शिवाय माती आणि शाडूच्या मूर्ती बनवण्याच्या आग्रह निपाणी व परिसरातील कारागरांना करण्यात आला आहे. त्यामुळे आता गणेश भक्त कोणत्या मूर्तीला पसंती देणार यावरच गणेश उत्सव होणार आहे.
राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळांने पीओपी मूर्तीच्या वापरासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर पीओपी ऐवजी मूर्तीसाठी माती, शाडू आणि कागदासह इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने उचललेल्या या पावलानंतर आता नगरपालिकासुद्धा अलर्ट मोडवर आली आहे. पीओपी मूर्ती संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक सूचना दिल्या आहेत. पालिकेने या सर्व बाबी लक्षात घेत पीओपी मूर्तीची आयात, विक्री या संदर्भात उपाययोजना आखण्याच्या तयारीत आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस आयुक्तांसह बैठक घेत आयाती संदर्भात कारवाईसाठी पोलिस प्रशासन, नगरपालिकांची बैठक घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवत प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना केल्या आहेत.
——————————————————————–
दरवर्षी १ लाख मूर्तीची आयात
दरवर्षी निपाणी तालुक्यात कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, बेळगाव संकेश्वरसह इतर शहरांमधून एक लाखापेक्षा अधिक घरगुती आणि सार्वजनिक पीओपी मूर्तीची आयात निपाणी शहरात होते. पर्यावरणास हानिकारक असलेल्या पीओपीपासून तयार केलेल्या या मूर्तीच्या माध्यमातून दरवर्षी प्रदूषणात भर पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन यंदा पीओपी मूर्तींचा थांबा शहराबाहेरच असणार आहे.


मातीच्या मूर्तीसाठी नगरपालिकेतर्फे स्टॉल
पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तीला प्रोत्साहन मिळावे,म्हणून शहरातील बाजारपेठेच्या विविध ठिकाणी नगरपालिकेतर्फे मूर्तीकारांना स्टॉल उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. किमान शुल्क आकारून मातीची मूर्ती विकणाऱ्या मूर्तिकार व विक्रेत्यांना हे स्टॉल उपलब्ध करण्याचा प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला आहे.


‘गणेशोत्सव केवळ तीन महिन्यावर येऊन ठेपला आहे. पण पीओपी मूर्ती बाबत अजूनही प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे कारागीर अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तात्काळ निर्णय जाहीर केल्यास त्याप्रमाणे मूर्तीकरांना काम करता येईल.’
– अशोक साळवी, मूर्तिकार, बुदलमुख

——————————————————————-
‘पीओपी मूर्तीमुळे दरवर्षी प्रदूषणामध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळांनी अशा मूर्तीबाबत योग्य निर्णय घेण्याबाबतच्या सूचना पत्राद्वारे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत लवकरच माहिती कळवली जाईल.’
– जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *