प्रा. डॉ. सिकंदर शिदलाळे : क्रांती दिनानिमित्त कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : भारताला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांनी सर्वस्व बलिदान दिले. भारत मातेला बलिदानाशिवाय मुक्त करता येणार नाही, त्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देऊन भारताला सोनेरी दिवस देण्याचे काम सशस्त्र क्रांतिकारकांनी केले. त्यामुळे क्रांतिकारकांचे योगदान भारतीय इतिहासातील अमूल्य ठेवा आहे असे, प्रतिपादन प्रा. डॉ. सिकंदर शिदलाळे यांनी केले. देवचंद कॉलेजमधील अर्जुननगर राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभाग आयोजित 9 ऑगस्ट क्रांती दिनिनिमित्त ‘स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान’ या विषयावर बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
इंग्रजी राजवट विरुद्ध आवाज उठवण्याचे काम आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी केले इंग्रजांनी राबविलेल्या जुलमी राजवटी विरुद्ध त्यांनी लोकांना एकत्रित केले व उठाव केला तसेच भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आजाद बुटकेश्वर दत्त यांनी सशस्त्र क्रांतिकारी चळवळी करून इंग्रजांना भारतातील राज्य करणे अवघड केले प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. सशस्त्र क्रांतिकारक लढा भारतीय इतिहासातील एक सुवर्ण पर्व होता यातून भारतीय व्यक्तीला राष्ट्रभक्ती अस्मिता जपण्यास शिकविले आज मिळालेले स्वातंत्र्य हे अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानावर मिळाले आहे, अशी प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजेत आपले राष्ट्र कसे प्रगतीपथावरती जाईल, हे पाहिले पाहिजेत. भारत अनेकता मध्ये एकता असलेला नाविन्यपूर्ण देश आहे आणि त्यामुळे भारतात राष्ट्रवाद चांगल्या पद्धतीने वाढविण्यासाठी कायमच क्रांतीकारकांचे चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे असे प्रा.डॉ.सिकंदर शिदलाळे यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी विविध आत्मचरित्रांचा अभ्यास करून आपले व्यक्तिमत्व विकास करावा असेही त्यांनी या ठिकाणी नमूद केले तसेच सशस्त्र चळवळीतील अनेक दुवे अनेक घटना विद्यार्थ्यांच्या समोर मांडल्या व विद्यार्थ्यांच्या मध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला कॉलेजच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी इंग्रजांनी थोड्याच अवधीमध्ये भारत काबीज केला हे सांगत असताना अरब आणि उंट यांची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले
देवचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए. डी. पवार पर्यवेक्षिका, एस. पी. जाधव, प्रा. आर. एस. कुंभार, प्रा. यु, आर, पाटील, प्रा. सागर. माने, प्रा. अनिल खोत, प्रा सागर परीट, प्रा. टी. ए. पाटील, प्रा. डी. बी. एस. कुंभार, प्रा. अर्चना पाटील, सोकासने आर. एस, उपस्थित होत्या.
यावेळी देवकी घोळवे, सरिता कोळी, आदिती घस्ते व सानिका पट्टेकरी यांनी मनोगत व्याक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल घटेकरी प्रास्ताविक के. यांनी सूत्रसंचालन प्रिया सुरेश हजारे यांनी केलेप्रा. अर्चना पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta