डॉ. स्नेहल पाटील : निपाणीतील हुतात्मा स्मारक येथे क्रांती दिन साजरा
निपाणी (वार्ता) : प्रत्येक नागरिकाने देशासाठी योगदान दिले पाहिजे, आपले राष्ट्रीय कर्तव्य काय असते, आपण देशासाठी काय करु शकतो हे पाहिले पाहिजे. आसपासच्या परिसरात व देशात घडणाऱ्या प्रत्येक अप्रिय घटनांच्या संदर्भातदखल घेऊन त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे तरच खरे स्वातंत्र्य सर्वांपर्यंत पोहोचेल.
या साठी महिला संघटनांनी जास्त जागरुकतेने कार्य करणे आवश्यक आहे, असे मत प्रमुख वक्त्या डॉ. स्नेहल पाटील यांनी व्यक्त केले. येथील हुतात्मा स्मारक येथे दिग्विजय युथ क्लब, साखरवाडी स्पोर्टस् क्लब, जिजामाता भगिनी मंडळ, क्रांती ज्योती महिला मंडळ, इनरव्हिल क्लब, नारीशक्ती महिला मंडळ , सृष्टी पर्यावरणवादी संघटना व इतर संघटनांच्या सहकार्याने क्रांती दिन साजरा करण्यात आला त्यावेळी डॉक्टर पाटील बोलत होत्या.
प्रारंभी डॉ. स्नेहल जोतिबा पाटील यांच्या शुभहस्ते स्मारकाचे पुजन करण्यात आले. ध्वजारोहन शरयु शंतनु मानवी यांचे हस्ते करण्यात आले. व सामुहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
बाळासाहेब कळसकर यांनी स्वागत केले. दिग्विजय युथ क्लबचे अध्यक्ष दिपक इंगवले यांनी स्त्री शक्तीचा आदर व्यक्त करण्यासाठीच आज महिलांच्या हस्ते हा कार्यक्रम करत असल्याचे सांगितले. गेली 28 वर्षे हा उपक्रम राबवत असताना सर्व घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले असे सांगितले.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. अच्युत माने, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, शिवसेनेचे बाबासाहेब खांबे, अभय मानवी, प्रा.सुरेश कांबळे, जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष तुकाराम कोळी सर, बाबुराव भोपळे, अमरनाथ घोडके, अनिल खाडे, स्वाती दबडे, श्रेया खेडेकर, प्रा. कांचन बिरनाळे, वैजयंती बुध्दाचार्य, पुनम लाड, लतिका दैव, स्मिता शेनॉय, संजिवनी पावले, मनिषा पठाडे, दिपा तिळवे, आशा तिळवे, अंजना पोतदार, वर्षा रांगोळे, राजशेखर जडी, बापु इंगवले, मोहन जाधव, रविंद्र पावले, सतिश येडुरे, उमेश भोपे, इंद्रजित भोसले, रजनीकांत बाचणकर, आनंद संकपाळ, सचिन सुतार, सुधाकर कांबळे, फिरोज चाऊस, सुधाकर माने, बजरंग तोरसकर, शब्बीर आत्तार, सचिन लोकरे उपस्थित होते. रविंद्र पावले
यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta