निपाणी : निपाणी नगरपरिषदेवर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर भगवा फडकवण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना पोलिसांनी रोखले.
आमदार शशिकला जोल्ले आणि अधिकाऱ्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर निपाणी नगरपालिकेचे सदस्य विनायक वाडे आणि संजय सांगावकर हे भगवा फडकवण्यासाठी सज्ज होते. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा प्रयत्न हाणून पाडला.
हे दोघेही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निपाणी नगरपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
दरम्यान, समजलेली माहिती वेगळीच आहे. निपाणी नगरपालिका कार्यालयावरील भगवा झेंडा जीर्ण झाल्याने तो बदलण्यात यावा अशी मागणी नगरसेवक संजय सांगावकर व विनायक वडे यांनी केली होती. परंतु पोलीस प्रशासनाने हा भगवा झेंडा बदलण्यास त्यांना मज्जाव केला. यामुळे सांगावकर व वडे यांनी पालिका सभागृहाबाहेर ठाण मांडले. असे वृत्त मिळाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta