Monday , December 8 2025
Breaking News

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज : युवा नेते उत्तम पाटील

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आज सर्वत्र वृक्षारोपण करण्यात येत आहे. पण त्यांचे संगोपन करणे तितकेच गरजेचे आहे. आज वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात युवा नेते उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपणचे महत्व जाणून बोरगाव शहरासह उपनगरांमध्ये नगरपंचायत वतीने सुमारे ५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले.
विविध जातींचे व वनस्पती औषधांची ही वृक्षारोपण झाले असून यासाठी नागरिकांनीही याचे महत्त्व जाणून वृक्षारोपणावर अधिक भर द्यावे. आपापल्या घरासमोर एक झाड लावून परिसराचे संरक्षण करावे, असे आवाहन यावेळी उत्तम पाटील यांनी केले.
आरोग्य अधिकारी विलोल जोशी यांनी, वृक्षारोपण केल्याने परिसरातील वातावरण समतोल राहते. कोरोना काळात खऱ्याअर्थाने वनस्पती औषधांचे महत्त्व नागरिकांना कळाले. यासाठी सर्वांनी याचा अभ्यास करून आपल्या घरासमोर वृक्षारोपण करावे असे सांगितले.
याप्रसंगी प्रभारी मुख्याधिकारी राहुल गुडयीनकर, आरोग्य अधिकारी विलोल जोशी, महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे, द्वितीय चर्चा सहाय्यक पोपट कुरळे, तलाठी विठ्ठल ढवळेश्वर, नगरसेवक अभय मगदूम, माणिक कुंभार, बाहुबली सोबने, प्रदीप माळी, पिंटू कांबळे, रोहित पाटील, सौ. शोभा हावले, गिरिजा वठारे, अश्विनी पवार, रोहिणी सोबाने, संगीता शिंगे, अमर शिंगे, राजू मगदूम, अशोक माळी, अशोक जे, कुमुदिनी महाजन यांच्यासह सर्व नगरसेवक अंगणवाडी, आशा कार्यकर्ते, आरोग्य पदाधिकारी व शहरवासीय उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *