व्ही. डी. इंदलकर; कुर्लीतील रांगोळी स्पर्धेस प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी ही आनंद, सकारात्मकता आणि चैतन्याचे प्रतिक मानले जाते, असे मत अक्कोळ येथील पार्श्वमती कन्या शाळचे चित्रकला शिक्षिका व्ही. डी. इंदलकर यांनी व्यक्त केले.
कुर्ली येथिल एचजेसीचिफ फौंडेशन पुरस्कृत जवान गणपती चौगुले यांचे स्मरणार्थ मराठा भवन येथे महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी यशोदा चौगुले या होत्या.
ज्योती चौगुले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते जवान गणपती चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मेघा चौगुले यांनी स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट केले. या स्पर्धेत एकूण ५८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. अंजली अमृतसमन्नावर व सी. बी. कोंडेकर यांनी परीक्षण केले. स्पर्धेत शारदा निकाडे, पूजा पाटील, सृष्टी चव्हाण, आरती नाईक, रिया घाटगे यांनी प्रथम ते पाचव्या क्रमांकाची बक्षीसे पटकावली. उतेजनार्थ पारितोषिक-भाग्यश्री चौगुले व प्रियांका बोधले यांनी पटकाविले तर विशेष पारितोषिक त्रिशा चौगुले व वैष्णवी व्हराटे यांनी पटकाविले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कमल चौगुले, सुनीता चौगुले, अनिता चौगुले, ऋतुजा चौगुले, आकांक्षा रेडेकर, नीतू चौगुले, नीलम चौगुले यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी डी. एस. चौगुले, सीताराम चौगुले, सुभाष चौगुले, शिवाजी चौगुले, लक्ष्मण चौगुले, एस .एस. चौगुले, शैलेश बोंगार्डे, वल्लभ चौगुले, जयदीप चौगुले, संजय चौगुले यांच्यासह स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेनंतर रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले. कुर्ली पंचक्रोशी परिसरातील शाळांचे विद्यार्थी, महिला व ग्रामस्थ यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta