निपाणी (वार्ता) : देशात सर्वत्र १९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्त निपाणी व निपाणी भाग फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर असोसिएशनतर्फे ‘एक दिवस आपल्या समारंभासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.१९) सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता निपाणी परिसरातील सर्व फोटोग्राफर मिळून धर्मवीर श्री. संभाजी महाराज चौक ते निपाणी नगरपालिका कार्यालयपर्यंत कॅमेरा व वृक्ष पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी सी., बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार आणि उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी शहर आणि परिसरातील फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर संघटनेच्या सदस्यांनी सकाळी ९ वाजता धर्मवीर संभाजी राजे चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta