जागतिक फोटोग्राफर दिन; मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : शहर व ग्रामीण भाग फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने शनिवारी(ता.१९) निपाणीत जागतिक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने असोसिएशनच्या वतीने समाजाला सध्या गरज असणारे कॅमेरा आणि वृक्ष अशा अनोख्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजीराजे चौक ते नगरपालिका कार्यालयापर्यंत हा दिंडी सोहळा काढण्यात आला यामध्ये शहर व ग्रामीण भागातील शेकडो फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर सहभागी झाले होते.
जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या हस्ते कॅमेरा व रोपांचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा सत्कार फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. तुलसी आणि विनासह टाळांच्या गजरात अभंगांच्या निनादात गुरुकृपा भजनी मंडळ -जत्राट यांच्या माध्यमातून हा सोहळा सुरू करण्यात आला.
यावेळी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बाडकर, उपाध्यक्ष विनायक पाटील, सेक्रेटरी संजय सूर्यवंशी, खजिनदार विजय दावणे, मारुती घाटगे, सुरज कराळे, प्रदीप भोईटे, अजित शिंगे, राजू शिरोळे, श्रीनिवास जाधव, अवधूत गडकरी, युवराज कुरले, शुभम खोत, ऋतुराज पायमल, अलंकार कंगळे, बंडा कडोलकर, विनू चौगुले, श्रीकांत कुंभार, रितेश रांगोळी, नंदू शेडगे, सुरेश शिंदे, श्रीनिवास जाधव, आप्पासो दिंडे यांच्यासह फोटोग्राफर उपस्थित होते. अध्यक्ष नरेंद्र बाडकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta