संस्थापक सचिन खोत : वर्धापन दिन साजरा
कोगनोळी : परिसरातील नागरिकांच्या, सभासद, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदारांच्या सहकार्यामुळेच दत्तगुरु संस्थेची प्रगती झाली आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. संस्थेचे 2 हजार सभासद आहेत. शेअर भांडवल 11 लाख 49 हजार, राखीव व इतर निधी 1 कोटी 21 लाख, ठेवी 90 कोटी 82 लाख, कर्ज वितरण 31 कोटी 93 लाख, बँक ठेव व गुंतवणूक 55 कोटी 55 लाख, खेळते भांडवल 92 कोटी पंधरा लाख रुपये आहे अशी माहिती दत्तगुरु पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत यांनी दिली.
कोगनोळी तालुका निपाणी येथे सातव्या वर्धापन दिनानिमित्त ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक के डी पाटील यांनी केले.
यावेळी विषय पत्रिकेचे वाचन जनरल मॅनेजर विद्यासागर बाळीकाई यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष निलेश खोत, संचालक अनिल खोत, उपाध्यक्ष डॉक्टर महादेव मिरजे, ग्राम पंचायत अध्यक्षा वनिता खोत, उपाध्यक्ष रूपाली आवटे, अक्काताई खोत, कुमार पीडाप पाटील, अनिल चौगुले, बाळासाहेब कागले, युवराज कोळी, तुकाराम शिंदे, रामगोंडा चौगुले, बंडोपंत संकेश्वरे, अनिल कोंडेकर, सुभाष करंजे, अरुण निकाडे, के डी पाटील, अमर शिंत्रे, शिवाजी खोत, शुभांगी खोत, शर्मिला पाटील, वीरश्री पाटील यांच्यासह सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta