निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यामंदिर सिदनाळ येथे संस्थेचे संस्थापक, गुरुकुल शिक्षण प्रणालीचे पुनरोद्धारक गुरुदेव समंतभद्र महाराज यांची १३५ वी पुण्यतिथी झाली. अध्यक्षस्थानी समाजसेवक आर. पी. पाटील तर प्रमुख पाहुणे बाबासाहेब मगदूम, राजगोंडा पाटील, पी. बी. आश्रम स्तवनिधीचे सदस्य प्रदीप पाटील हे होते.
प्रारंभी गुरुदेवांच्या परिचयाचे फलक अनावरण करण्यात आले. त्यानंतर संगणक कक्षाचे आर. पी. पाटील यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. एस. बी. बेळगुदरी यांनी स्वागत केले. त्यानंतर गुरुदेव १०८ समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. नंतर क्रीडा स्पर्धा, चित्रकला, हस्ताक्षर, वाचन या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच २०२२- २३ सालातील एस.एस.एल.सी. परीक्षेत प्रथम आलेल्या श्रावणी नेजे हीचा सन्मान करण्यात आले. त्यानंतर व्ही. बी. पाटील, मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापूरे, निवृत्त शिक्षक एस. बी. गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. आर. पी. पाटील यांनीअध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भरभरून द्यावे. शालेय शिक्षणाबरोबर संस्कार, संस्कृती व आधुनिक ज्ञान विद्यार्थ्यांना द्यावे. विद्यार्थी सुद्धा चांगला अभ्यास करून आपल्या शाळेचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले.एस. एन. रायनाडे यांनी सूत्रसंचालन केले
पी.एम. तोटद यांनी आभार मानले.
कार्यक्रमास भरत कलाजे, आनंदा नेजे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मगदूम, प्रतीक मदन पाटील, ए. बी. नेजे, जे. आर. देसाई, शितल मगदूम, दादा मगदूम, संजय वाळवे, सुकुमार मगदूम, अण्णासाहेब पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.