अंकुरम शाळेचा उपक्रम: निपाणी परिसरातून कौतुक
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी राखी पौर्णिमेनिमित्त राख्या तयार केल्या होत्या. या राख्या भारतीय सैन्य दलातील जवान नामदेव लाड यांच्याकडून नागालैंड येथे कार्यरत असलेल्या जवानांना पाठवण्यात आल्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व निपाणीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.उत्तम पाटील, संचालक डॉ. जोतिबा चौगुले, मीना शिंदे, प्राचार्या चेतना चौगुले उपस्थित होत्या.
प्राचार्या चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी विविध प्रकारच्या राख्या व शुभेच्छा पत्रके बनवण्यात आल्या होत्या. या मावशी भूमिका स्पष्ट करून जवान नामदेव लाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. येत्या राखी पौर्णिमेपर्यंत नामदेव लाड यांच्यामार्फत या राख्या नागालैडमचील भारतीय जवानांपर्यंत पोहोचतणार आहेत.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूह गीत, भाषण व राष्ट्रभक्तीवर आधारित नृत्याचे सादरीकरण केले. नामदेव लाड यांनी मुलांना राष्ट्रनिष्ठा व राष्ट्राविषयी प्रेम जोपासण्याचे आवाहन केले. तर डॉ. जोतिबा चौगुले यांनी सशक्त भारतासाठी युवकांनी कांनी शरीरयष्टी जोपासण्याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्या चेतना चौगुले यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला.
ओसिया शहा यांनी सूत्रसंचालन केले तर स्वाती पठाडे यांनी स्वागत केले. रुपाली यादव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे सचिव डॉ. अमर चौगुले व प्राचार्या चेतना चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta