निपाणी (वार्ता) : आजचे युवक सोशल मीडियाच्या माध्यमात अधिक दिसत आहेत. संस्कार व संस्कृतीला महत्त्व देत आजच्या युवकांमध्ये देशप्रेम वाढावे, यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढाकार घेत असून त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. आजच्या युवकांनी आपल्यात देश प्रेम वाढवावे, असे मत बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
शिवापूरवाडी येथील अभिनंदन खोत याची आसाम रायफलमध्ये निवड झाल्याने त्याचा बोरगाव येथे उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ग्रामीण भागातील अनेक युवक सैन्य भरतीत दाखल होत आहेत. सैन्य भरतीत दाखल होण्यासाठी त्यांची धडपड ही प्रेरणादायी आहे. या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन सर्वच युवकांनी शालेय जीवनापासून सैन्य भरतीचे ध्येय बाळगावे व त्यासाठी प्रयत्नही करावेत. अशा सैन्य भरतीतील युवकांना नेहमीच अरिहंतचे सहकार्य राहणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिरदवाडचे कुमार पाटील, शिवापूरवाडीचे सागर खोत, शशिकांत खोत, राजू खोत, अनिकेत खोत, अक्षय चव्हाण, संजय जोमा, विजय खोत, किरण खोत, अभिनंदन खोत उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta