विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे रक्तदान शिबिर
निपाणी (वार्ता) : जगात सर्वच गोष्टीचा विज्ञानाने शोध लावला आहे. पण मानवी रक्ताचा शोध किंवा निर्माण करणे विज्ञानाला जमलेले नाही. म्हणून रक्तदान करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने वर्षात़ून किमान दोन वेळा रक्त दान केले पाहिजे. रक्तदान हेच आजचा युगातील श्रेष्ठदान आहे. यासाठी तरुणांनी पुढाकार घेवून रक्तदान शिबिर प्रत्येक गावागावामध्ये आयोजित करावीत, असे आवाहन समाधी मठाचे प्राणलिंग स्वामींनी केले.
सौंदलगा (ता.निपाणी) येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड आणि रोटरी क्लबतर्फे आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी भारत मातेचे पूजन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्राणलिंग स्वामी, निपाणी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरू तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, रोटरी ब्लड डोनेटचे अध्यक्ष आनंद सोलापूरकर, विश्व हिंदू परिषदचे कायदेशीर सल्लागार गणेश गोंधळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रवीण तारळे, गणेश गोंधळी यांनी सध्याच्या युगात रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी २१ जणांनी रक्तदान केले. शिबिरास आनंदा सूर्यवंशी, सचिन अडसूळ, वैष्णव चौगुले, रोहित पाटील, निखिल जुगळे, अजय शेळके, प्रज्वल कारंडे, अजित शेवाळे, सागर श्रीखंडे, प्रवीण चव्हाण यांच्यासह बजरंग दल विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta