कोगनोळी : निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पदी बी. एस. तळवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार केला.
ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी कोरोना काळात अत्यंत चांगले काम करून नागरिकांना सेवा सुविधा पुरवण्याचे काम केले. त्याचप्रमाणे त्यांनी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून उपनिरीक्षक म्हणून चांगले काम करून अनेक गुन्ह्यांचा शोध लावला आहे. या सर्वांची दखल घेऊन त्यांना मंडल पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यांच्याकडून सीपीआय म्हणून चांगलेच काम होईल असे मनोगत व्यक्त केले.
सीपीआय बी. एस. तळवार म्हणाले, काम करत असताना सर्व नागरिकांना कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आपण प्रामाणिक काम करणार असल्याचे सांगून सत्काराबद्दल आभार मानले.
यावेळी पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत लोखंडे, विनायक आवटे, युवराज कोळी, शिवाजी नाईक, संजय पाटील, दादासाहेब माणगावे, तुकाराम शिंदे, संजय खोत, सुनील कागले, धनंजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta