तहसीलदार बळीगार ; निपाणीत गृहलक्ष्मी योजनेचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : महिला सर्वच क्षेत्रात काम करीत असल्या तरी त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानले जात नव्हते. पण अलीकडच्या काळात सरकारने त्यांनाच कुटुंब प्रमुख करून महिला सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता दर महिना महिलांच्या खात्यामध्ये शासनाकडून दोन हजार रुपयाची रक्कम जमा होणार आहे. याशिवाय आणि महिलांसाठी अनेक सुविधा शासनाने सुरू केले आहेत. गृहलक्ष्मी योजनेबाबत काही अडचणी असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार एम.एन. बळीगार यांनी केले. येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात आयोजित गृहलक्ष्मी योजना प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रवीकुमार हुक्केरी, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी उपस्थित होते.
प्रारंभी महिला व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. महिला व बालकल्याण अधिकारी राममूर्ती यांनी, महिला सबलीकरणासाठी राष्ट्रांमध्ये प्रथमच गृहलक्ष्मी योजना कर्नाटकात सुरू करण्यात आली आहे. याशिवाय शासनाकडून महिलांना बस वीज धान्य मोफत दिले जात आहे. ही योजना पारदर्शकपणे सुरू असून जळगाव जिल्ह्यात अकरा लाख महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी सभापती किरण कोकरे यांच्यासह महिलांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर म्हैसूर येथील गृहलक्ष्मी योजना प्रारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, माजी सभापती विश्वास पाटील, निकु पाटील, युवराज पोळ, रियाज बागवान, गजेंद्र पोळ, संदीप इंगवले, प्रदीप सातवेकर, अशोक लाखे, शरीफ बेपारी, अल्लाबक्ष बागवान, मुन्ना काझी, शशिकांत चडचाळे, प्रा.राजन चिकोडे, रवींद्र श्रीखंडे, रामा निकम सुधाकर सोनाळकर, दिलीप जाधव यांच्यासह अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या व महिला उपस्थित होत्या. जयश्री कौजलगी यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta