वृक्ष रक्षाबंधन : अंकुरम इंग्लिश मेडियम स्कूलचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : भाऊ-बहीण यांच्या अतूट प्रेमाचे नाते असलेला रक्षाबंधनाचा सण आणि निसर्गाशी असलेले माणसाचे नाते यांची सांगड घालत झाडांना राखी बांधत निपाणी येथील कोडणी रोडवरील येथील अंकुर इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडांना पर्यावरण पूरक राख्या बांधून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा पर्यावरणपूरक वृक्ष रक्षाबंधनाचा संदेश दिला.
भारतीय संस्कृतीत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राखी पौर्णिमा सणाच्या निमित्ताने बाजारपेठा विविध राख्यांनी सजल्या आहेत. शाळेतील प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याकडून रंगीत कागद, वह्यांचे पुठ्ठे, टिकल्या यांचा वापर करूनआकर्षक राख्या तयार करून घेतल्या. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘वृक्ष हीच खरी संपत्ती’, ‘झाडे लावा घरोघरी’ असा संदेश राख्यांवर लिहून या राख्या विद्यार्थ्यांनी झाडांना बांधल्या.
निसर्गाचे रक्षण करण्याची गरज लक्षात घेता बालवयातच केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून झाडांचे संरक्षण व संवर्धन करण्याची प्रेरणा, तसेच समाजप्रबोधन व जनजागृतीसाठी चिमुकल्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.उत्तम पाटील, सेक्रेटरी डॉ.अमर चौगुले, संचालक डॉ.ज्योतिबा चौगुले, मीना शिंदे व पालकांनी कौतुक केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या चेतना चौगुले, समन्वयिका अर्पिता कुलकर्णी, मारुती महाजन, ओशिया शहा शिल्पा चडचाळे, ज्योती चवई, स्वाती पठाडे, सावित्री पाटील, हर्षदा पुरंदरे, शिल्पा तारळे, प्रियंका भाटले, नाझनीन होसुरी, पद्मश्री पाटील, माधुरी लोळसुरे, रूपाली यादव, अश्विनी ढाले, अश्विनी हत्ती यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
——————————————————————-
‘झाडे आपल्याला ऑक्सिजनसह फळे, फुले, लाकूड,सावली देतात. झाडांची होणारी कत्तल थांबवून झाडांना राख्या बांधून नवीन झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प शिक्षकासह विद्यार्थ्यांनी केला आहे.’
– चेतना चौगुले,
प्राचार्या, अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta