निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील जनता शिक्षण मंडळाच्या मोहनलाल दोशी विद्यालय, किरणभाई शाह विद्यानिकेतन, मराठी कॉन्व्हेंट व देवाशिष इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मेंदू विकास साधण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ.तृप्तीभाभी शाह उपस्थित होत्या.
तज्ञ मार्गदर्शक सागर चौगुले व त्यांच्या मातोश्री पी. एस. चौगुले यांनी प्रशिक्षणातून अभ्यासात मागासलेले, मोबाईलच्या आहारी गेलेले, तसेच विशेष गती असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकास करण्यासाठी तयार केलेल्या ३५ प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास एस.टी. यादव, एस. के. कांबळे, ए. एम. बोधले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यु. एम. सातपुते यांनी सूत्रसंचालन तर आर. आर. कपले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta