निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार शाळा शिक्षण आणि साक्षरता विभाग, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, चिक्कोडी, क्षेत्र समन्वय अधिकारी कार्यालय यांच्या नेतृत्वाखाली ए. एस. पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर स्तवनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने स्तवनिधी येथे तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा पार पडल्या. अध्यक्षस्थानी संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे चिक्कोडी कार्यालयातील शिक्षणाधिकारी ए. डी. गडेकाई, नवलिहाळ येथील शारीरिक शिक्षक अम्मीनभावी एस. एस. तेरदाळ यांनी केला. प्राथमिक शारीरिक शिक्षक संघटना कार्यदर्शी एन. जी. पाटील उपस्थित होते.
बी. बी. दादन्नावर यानी स्वागत केले. संचालक महावीर पाटील यांनी क्रीडा ध्वजारोहण केले. भूमिका पाटील हिने क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. एस. पी. बाबन्नाणावर यांनी प्रतिज्ञाचे वाचन केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महावीर पाटील ए. डी. गडेकाई व एन. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत विविध शाळातील ४८ संघानी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. यावेळी व्ही. एस. पुजारी, टी. ए. घोसरवाडी, राहुल उमदी यांच्यासह विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पूजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आर. जी. सौंदलगी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta