एम. आर. पाटील; कुर्लीत व्हॉलीबॉल, थ्रो बॉल स्पर्धा
निपाणी (वार्ता) : विद्यार्थी व पालकांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टकोन बदलेला आहे. बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास महत्वाचा आहे. खेळाच्या माध्यमातून समाज सक्षम बनवण्यासाठी शालेय स्तरावर स्पर्धा आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी खेळ आणि स्पर्धा महत्वाच्या असल्याचे मत सौंदलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष एम. आर. पाटील यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात निपाणी तालुका स्तरीय व्हॉलीबॉल व थ्रो बॉल स्पर्धा उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते.
ए. ए. चौगुले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. बी. एस. पाटील यांच्याहस्ते ध्वजपूजन, एम. आर. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, एस. एस. यलहट्टी यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन, शिवाजी चौगुले, आकाश तेली, अमित नारे, यांच्या हस्ते मैदान पूजन झाले. एस. व्ही. बुरलट्टी यांनी क्रीडा प्रतिज्ञा दिली.
व्हॉलीबॉल माध्यमिक विभाग मुले- सिद्धेश्वर विद्यालय, कुर्ली व सरकारी माध्यमिक शाळा शिरगाव
मुली- के. आर. सी. एस. हंचिनाळ व कन्या शाळा, निपाणी
प्राथमिक विभाग व्हॉलीबॉल स्पर्धेत
मुले- एम. इ.एस. इंग्लिश मेडीयम निपाणी व साई हायस्कुल,मांगुर
मुली- के आर सी एस हंचिनाळ व एस बी एस कन्या शाळा निपाणी
थ्रोबॉल माध्यमिक विभाग
मुले-सिद्धेश्वर विद्यालय, कुर्ली एल इ एस बेडकीहाळ
मुली – के आर सी एस हंचनाळ व एल इ एस बेडकीहाळ
थ्रोबॉल प्राथमिक विभाग
मुले- कन्नड शाळा बेडकीहाळ व एल इ एस बेडकीहाळ
मुली- के आर सी एस हंचनाळ व के एल ई निपाणी
विजेत्या व उपविजेत्या संघांना देवचंद महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक डॉ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सदस्य एस. एस. चौगुले, पुंडलिक यादव, शिवाजी चौगुले, सुरेश ढगे, बाबुराव पाटील, टी. एम. यादव, प्रशांत माळी, भैय्या पाटील, सौरभ व्हराटे, अनिल वठारे, संदीप पिष्टे यांच्यासह नविविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. डी. डी. हाळवणकर यांनी सूत्रसंचालन केले. एस. ए. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta