Wednesday , March 4 2026
Breaking News

निपाणीच्या जनतेने पाणी प्रश्नासाठी सामूहिक प्रयत्नासाठी एकत्र या

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सध्याच्या परिस्थितीत अस्मानी संकटामुळे आपल्या निपाणी शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांची बिकट अवस्था निर्माण होऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळेनिपाणीच्या जनतेने पाणी प्रश्नासाठी सामूहिक प्रयत्नासाठी एकत्र येऊन सोमवारी (ता.४) सकाळी ११ वाजता नगरपालिका प्रशासन, तहसीलदार व निपाणी सीपीआय यांना निवेदन देवून पाण्यासाठीच्या निपाणीकरांच्या तीव्र भावना कळविण्यात येणार आहेत. त्यासाठी शहरवासीयांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले-सडोलकर यांनी केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत जवाहर तलावात साठलेले पाणी दूषित झालेले असून नदीमधून आठ दिवसातून एकदा पाणी येत आहे. परंतु ज्यावेळी नदीतून जेंव्हा पाणी संपल्या नंतर सध्याच्या स्थिती पेक्षा पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे. प्रशासकीय यंत्रणा व लोक प्रतिनिधींनी आत्तापासूनच योग्य पाणी नियोजन केल्यास भविष्यातील पाणी समस्या गंभीर बनणार नाही. त्यासाठी निपाणीतील जागृत सर्वपक्षीय निपाणी नागरी न्याय हक्क संरक्षण समितीच्या वतीने आयोजित केलेल्या निवेदनासाठी सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी आपसातील गत, तट सोडून सामूहिक प्रयत्नांसाठी एकत्र येऊन लढा उभारला तरच निपाणीकराना पाणी प्रश्न सुटु शकतो. त्यासाठी सोमवारी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *