निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. वेंकटेश्वरा कॉलेजमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. चिकोडी उपनिर्देशक, शाळा शिक्षण (पदवी पूर्व) व श्री वेंकटेश्वरा पदवीपूर्व कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा संयोजक अजय मोने, केएलई सीबीएसईचे प्राचार्य नितेश नाडे उपस्थित होते.
प्रारंभी निपाणी तालुका क्रीडा संयोजक जितू पाटील यांनी स्वागत केले.विक्रमादित्य धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यातआले. क्रीडा ज्योतचे उद्घाटन अजय मोने यांच्या हस्ते तर मैदान पूजन नितेश नाडे यांच्या हस्ते झाले. अजय मोने, विक्रमादित्य धुमाळ, नितेश नाडे यांनी, जिद्द व चिकाटी दाखवून खेळाडूंनी यश संपादन करण्याचे आवाहन केले.
यावेळी कॉलेजच्या प्राचार्या ए. सी. धुमाळ, उपप्राचार्य एम. डी. खोत, पी. डी. निर्मळे, शुभांगी पाटील, यु.आर. पवार ,एस. बी.पवार, आर. एस. चव्हाण यांच्यासह विविध कॉलेजचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सीबी एससीचे प्राचार्य,केएलईचे प्राचार्य, अटल बिहारी वाजपेयी कॉलेजच्या प्राचार्यांचे सहकार्य लाभले. एस.पी. जगदाळे यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक एस. एस. पचंडी आभार मानले.