निपाणी (वार्ता) : येथील राम नगरात वास्तव्यास असलेल्या अंजना कांबळे आणि वडील बाबासाहेब कांबळे यांच्या विवाहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची कन्या व चिकोडी येथील कर्नाटक स्टेट एक्साईज कार्यालयातील कर्मचारी असलेल्या संगीता शिवानंद चिक्कमठ यांनी येथील बसव गोपाळ अनाथ आश्रमातील गरजू ३५ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
या अनाथ मुलाचे संगोपन करणारे राजूगौडा गौराई यांच्याकडे संगीता यांनी मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत सुपूर्त केली.
प्रत्येक महिन्याला आपल्या वेतनातील आर्थिक मदत व जीवनावश्यक अन्नधान्य व इतर वस्तू अनाथ व गरजू मुलांना देणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta