कामकाजाची घेतली माहिती; समाधी मठ शाळेतही बांधल्या राख्या
निपाणी (वार्ता) : विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीच्या निपाणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक शिवराज नाईक व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी पोलिसांना गोड धोड खायलाही घातले. तसेच दुर्गा वाहिनीच्या युवतीसह महिलांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती घेतली.
उपनिरीक्षक शिवराज नाईक यांनी, या उपक्रमाचे कौतुक करून युवतींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन पोलीस ठाण्यात चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली.यावेळी दुर्गा वाहिनीच्या प्रमुख श्वेताताई हिरेमठ यांनी, भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव यांना खूप महत्व आहे. यामधील रक्षाबंधन हा उत्सव भगिनी साठी महत्वाचा मानला जातो. यामध्ये प्रत्येक स्त्रीचा भाऊ त्याच्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. त्याचप्रमाणे पोलीस भाऊ सुद्धा समाजातील महिलांचे रक्षण करतात. त्यासाठी हा उपक्रम राबविण्याचे सांगितले.
विश्व हिंदू परिषदच्या जिल्हा उपाध्यक्षा सुचित्रा ताई कुलकर्णी यांनी, बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन सण आहे. पण पोलीस बांधव हे समाजाच्या रक्षणासाठी २४ तास आपल्या घरासह आपल्या परिवारातील व्यक्तीपासून दूर राहून समाजाचे रक्षण करतात. याची जाणीव ठेवून विश्व हिंदू परिषद व दुर्गा वाहिनी तर्फे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यासमवेत रक्षाबंधन साजरा केल्याचे सांगितले.
दुर्गा वहिनीकडून समाधी मठ येथील निवासी शाळेमधील पन्नास हून अधिक विद्यार्थ्यांना राखी बांधून हा साजरा केला. यावेळी यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईक, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, रघुनाथ मुन्याळ, संजय कागौडर, प्रशांत कुदरी, मंदिरा पुजारी, मयुरी कांबळे, कोमल पुजारी, कल्याणी पुजारी, अमृता पाटील, कावेरी पुजारी, संजना गुंजाळ, समृद्धी पाटील यांच्यासह विश्व हिंदू परिषद व दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते उपस्थित होते.