निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लबतर्फे एमएचएम अंतर्गत येथील विद्या संवर्धक संचलित व्हीएसएम हायस्कूल मध्ये सहावी ते दहावी पर्यंतच्या किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या स्त्रीरोग तज्ञ रोटेरीयन डाॅ. मीरा कुलकर्णी यांनी, सोप्या भाषेत आहार, शारीरिक स्वच्छता, मासीकपाळी व्यवस्थापन, मोबाईल वापराचे फायदे, तोटे या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच मुलींच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमात व्हीएसएम हायस्कूल मधील ३२४ विद्यार्थीनींना इनरव्हील क्लबच्या वर्षा संजय नंदर्गी व स्वाती मेहता यांच्यामार्फत सॅनीटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरु तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, इव्हेंट अध्यक्षा वर्षा नंदर्गी, वैशाली पाटील, संजय नंदर्गी, सुजय शहा, श्रेणीक मेहता, इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी अर्चना बुर्जी, स्वाती मेहता, स्मिता कुरबेट्टी, विद्या संवर्धक मंडळाचे सीईओ सिद्दू पाटील यांच्यासह हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थ्यीनीसह रोटरी आणि इनरव्हील क्लबचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta