निपाणी (वार्ता) : श्रीपंत भक्त मंडळ भुदरगड, राधानगरी, कापशी विभागातर्फे गारगोटी येथे गुरुबंधू व भगिनींचा महामेळावा रविवारी (ता.३) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुरुवर्य डॉ.श्री संजय अरुण पंतबाळेकुंद्री (अक्कोळ) यांना ‘जीवन गौरव पुरस्कार- २०२३ ‘ देवून गौरवण्यात आले.
लोकसेवेचा अखंड ध्यास घेऊन वैद्यकीय सेवेतून प्रामाणिक, निस्वार्थी सेवा व आध्यात्मिक क्षेत्रात संस्कृती, धर्म आणि अस्मिता टिकवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन गारगोटी विभागाचे अध्यक्ष योगेश पाटील, दिगंबर कुरळे, चंद्रकांत सुतार, दत्तामामा बर्गे, सुहास सातोस्कर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
श्री इंदुबाई मंदिर सांस्कृतिक हॉल गारगोटी येथे झालेल्या या महामेळाव्यात पायी दिंडी मार्ग सेवेत मदत करणारे अन्नदाते, कार्यकर्ते सेवेकरांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी बोधपीठ अंतर्गत सुहास सातोस्कर (सावंतवाडी), सीमा कुलकर्णी (निपाणी), चरणदास महाराज (राजगोळी), ओंकारेश्वर स्वामीमहाराज (रामकृष्ण मठ, बेळगाव,) मल्लिकार्जुन जगजंपी (बेळगाव) यांच्यासह गारगोटी, राधानगरी, गडहिंग्लज, कापशी, निपाणी भागातील गुरुबंधू,भगिनी उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta