Monday , September 21 2026
Breaking News

लोकायुक्तांच्या नावाने पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बेळगाव येथील आरोपीला अटक

Spread the love

 

बेंगळुरू : लोकायुक्त अधिकारी असल्याचा दावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष कोप्पड असे अटक आरोपीचे नाव आहे. संतोष कोप्पड हा मूळचा बेळगावचा असल्याची माहिती आहे. त्याच्यासोबत असलेला आणखी एक बनावट अधिकारी, देशनूर, बैलहोंगल येथील विकास पाटील हा फरार झाला आहे.

हे दोघे लोकायुक्त अधिकारी असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बनावट ओळखपत्र दाखवून ब्लॅकमेल करत होते. अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे पैसे घेण्यासाठी आलेल्या आरोपी संतोषला अटक करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *