
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्यामंदिर मधील सोहम साळवे व प्रतिक नेजे या विद्यार्थ्यांनी तालुका पातळी विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडलेल्या ‘गॅस लिकेज डिटेक्टर’ या माॅडेलने तृतीय क्रमांक पटकावला.
गॅस गळती स्वयंचलीत पध्दतीने शोधून काढून त्याची माहिती देणारे मशीन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेला होता. सध्याच्या जीवनात अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करुन मानवाचे जीवन सुरक्षित करण्यासाठी या माॅडेलचा निश्चितच फायदा होणार आहे.हे माॅडेल तयार करण्यासाठी विज्ञान शिक्षिका एस. बी. बेळगुद्री यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापूरे यांच्यासह शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta