निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात २४ वर्षे सेवा बजावणारे शिक्षक रामचंद्र बन्ने यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप मोकाशी यांच्या हस्ते रोपटे व सन्मानपत्र देऊन बन्ने दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी शिक्षक प्रतिनिधी आर.आर. कपले यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी, सत्कारमूर्तींनी निरपेक्ष सेवा बजावल्याबद्दल कौतुक केले. यु. एम. सातपुते यांनी मानपत्राचे वाचन केले. आर. एस. भोसले, आर. डी. देसाई,
एस. एच. श्रीखंडे, एस. एस. सांडगे, प्रांजल कांडेकर, मुग्धा खोत, स्वरांजली शिंदे, श्रेया गायकवाड, अक्षता खवरे, आरती वाडकर, अनुराधा सावंत, ज्ञानेश्वरी पोवार, यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्काराबद्दल बन्ने यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी एस. बी पाटील, कर्मचारी प्रतिनिधी बी. एल. तिप्पे, सुनीता बन्ने, सोनाली बन्ने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. एस. के. बुच्चे यांनी सूत्रसंचालन केले. डी. बी. बेनाडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta