कोगनोळी : जालना येथे मराठा आरक्षण साठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांना पोलिसांच्या वतीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा निषेध म्हणून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती.
कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथील टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.
कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या सर्व सरकारी वाहने टोलनाक्यावरून परत कर्नाटकात पाठवून देण्यात येत होती. कोल्हापूर बंद असल्याने निपाणी, संकेश्वर, चिकोडी, बेळगाव येथून महाराष्ट्रात जाणाऱ्या सर्व कर्नाटक महामंडळाच्या बस बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले.
महाराष्ट्र महामंडळाच्या वतीने कागल कोल्हापूर येथील बसेस कर्नाटक नजिक असणाऱ्या गडहिंग्लज, उत्तूर, आजरा, चंदगड, निपाणी, वंदूर, करनूर, शेंडूर आदी गावांना ये जा करत होत्या.
कोगनोळी टोल नाक्यावर मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, एएसआय विजय पाटील, एस ए टोलगी यांच्यासह पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
Belgaum Varta Belgaum Varta