Wednesday , December 10 2025
Breaking News

बंद घराचे कुलूप तोडून २५ तोळे दागिन्यासह ३ लाख लंपास

Spread the love

 

निपाणीत भर दिवसा चोरी; नागरिकांतून भीतीचे वातावरण

निपाणी (वार्ता) : येथील चिमगांवकर गल्लीमधील बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी रफीक अहमदमजीद पट्टेकरी यांच्या घरात तिजोरी फोडून २५ तोळे सोने व ३ लाख रूपयांची रोख रक्कम असा अंदाजे १६ लाख रूपयांची चोरी केल्याची घटना मंगळवारी (ता.५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री उशिरा घरातील सदस्य आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलीसांनी रात्री डॉग स्कॉड, ठसे तज्ञांना पाचारून करून तपास चालविला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळासह पोलिसांनी दिलेली माहिती अशी,
समजलेली माहिती अशी, येथील चिमगांवकर गल्लीत रफिक पट्टेकरी हे आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी वास्तव्यास आहेत. मुलीचे नोव्हेंबरमध्ये लग्न ठरल्याने ते पत्नी व मुलीसह मुंबईला खरेदीला गेले होते. तर घरातील इतर सदस्य इचलकरजी येथील नातेवाईकांच्याकडे गेले होते. तर दोन मुले स्वतःच्या सायकल दुकानाकडे होती.
चोरट्यांनी घराशेजारी असलेल्या बोळातून येवून मागील दारातून प्रवेश करून त्यांनी पुढील दाराला आतून कडी लावली. आतील खोलीत दाराजवळ असलेली तिजोरी कटवणी, कटर व इतर साहित्याच्या सहाय्याने फोडली. तिजोरीतील ५ तोळ्याची बोहरमाळ, ५ तोळ्याचा टिक्का, ५ तोळ्याचा हार आणि इतर १० तोळ्याचे दागीने आणि रोख ३ लाख रूपये रक्कम घेवून पोबारा केला.
चोरट्यांनी घरातून जाताना जिन्यावरून गच्चीवर जावून पाठीमागील दारातूनन पोबारा केला. यावेळी घरात आणि बाहेर सीसीटीव्ही असल्याने त्यामध्ये तो अडकणार नाही याची खबरदारी घेतली.पण गच्चीवर गेल्याने समोरील सीसीटीव्हीत चोरटा जाताना कैद झाला आहे. रात्री उशिरा सायकल दुकानातील मुले घरी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, उपनिरीक्षिका उमादेवी व सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबात रफिकअहमंद पट्टेकरी यांनी बुधवारी सकाळी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
—————————————————————–
मध्यरात्री श्वान पथक दाखल
चोरीची माहिती दिल्यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बेळगाव येथील श्वानपथक दाखल झाले. तर दोन वाजता सुमारास गोकाक येथील ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन ठसे घेतले आहेत.

——————————————————————–
चोरीसाठी विविध साहित्याचा वापर
चोरीसाठी नवीन एक्सा ब्लेड, पक्कड, पाना, बॅटरी, कटर ब्लेड अशा विविध साधनांचा वापर करण्यात आला आहे. तिजोरी उचकटल्यानंतर हे सर्व साहित्य टाकून चोरट्यांनी पोबारा केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *