मंत्री हेब्बाळकर; निपाणीत प्रथमच भेट
निपाणी (वार्ता) : राज्यात एकहाती काँग्रेसची सत्ता आल्याने पक्षाला बळकटी मिळाली. यापुढील सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत. निपाणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची सरकार दरबारी असलेली सर्व कामे तात्काळ करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर रविवारी (ता.१०) प्रथमच निपाणीला भेट दिली. यावेळी येथील साखरवाडी मधील मधील काँग्रेस कार्यालयात माजी आमदार काकासाहेब पाटील व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या.
मंत्री हेब्बाळकर यांचे काँग्रेस कार्यालयासमोर आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यानंतर काँग्रेस पक्ष व लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, निकू पाटील, सुप्रिया पाटील, गोपाळ नाईक, माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले, विजय शेटके, अल्लाबक्ष बागवान, अरुण आवळेकर, राजेंद्र चव्हाण, संदीप चावरेकर, वसंत धारव, रमेश भोईटे, सुधाकर सोनाळकर, वैभव पाटील, अल्लाबक्ष बागवान, मुन्ना काझी, बाबुराव खोत, शैलजा चडचाळे, नवनाथ चव्हाण, रोहित यादव अवधूत गुरव, प्रतीक शहा, अस्लम शिकलगार, वैशाली खोत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta