मंदिरात विद्युत रोषणाई ; गुरुवारी श्रावण समाप्ती
निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्याच्या चौथ्या व शेवटच्या सोमवारी (ता.११) निपाणी शहर आणि परिसरातील शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानिमित्त विविध मंदिरावर आकर्षक रोषणाई, खिचडीचे वाटप करण्यात आले. तर काही शिवमंदिराच्या ठिकाणी यात्रा भरली होती.
येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह इतर मंदिरात ‘हर हर महादेव’चा गजर दिवसभर सुरू होता. महादेव गल्लीतील महादेव मंदिरात नितीन गुरव, सचिन सुतार, किरण भालेभालदार व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूजा बांधली होती. तर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार दांपत्यासह भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला. यावेळी जपनाम झाला. त्यानंतर माजी सभापती सुनील पाटील दांपत्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
त्यानंतर रात्री पालखीची मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी (ता.१४) महादेव मंदिरात श्रावण समाप्तीचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी अनिल पाटील, अमर बागेवाडी, चंद्रकांत तारळे, गजानन वसेदार, सदानंद दुमाले, इराण्णा शिरगावे, महादेव पाटील, बाबासाहेब साजनावर, रवींद्र चंद्रकुडे, संजय मोळवाडे, समीर बागेवाडी, महेश दिवाण, विजय चंद्रकुडे, बंडू जलपुरे, बाळकृष्ण वसेदार, रोहित पाटील, शिवानंद वसेदार, कलय्या खोत, बाळू बाळीकणावर, उमेश पाटील, किरण भालेभालदार यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते व नीलंबिका महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. शिप्पूर येथील रामलिंग मंदिर, मंगळवार पेठेतील महादेव मंदिर या ठिकाणी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी भाविकांची दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शिप्पूर येथील रामलिंग मंदिरात यात्रा भरली होती.
Belgaum Varta Belgaum Varta