Thursday , September 19 2024
Breaking News

‘देवचंदच्या’ छात्र सेना, व्हाईट आर्मीतर्फे सिद्धोबा डोंगरात पदभ्रमंती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल ) येथील देवचंद महाविद्यालयातील छात्रसेना व व्हाईट आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने पांगिरे-बी येथील सिद्धोबा डोंगरात पदभ्रमंती करण्यात छात्रांच्या शारीरिक क्षमतांचा विकास व पर्यावरण संवर्धनाबाबत जाणीव निर्माण करून देण्यासाठी या एक दिवसीय जंगल पदभ्रमंती आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालय ते सिद्धोबा डोंगर व परत महाविद्यालय अशी पदभ्रमंती करण्यात आली.
प्रा. डॉ. अशोक डोनर यांनी डोंगर परिसरातील वृक्ष, किटक, फुलपाखरांची माहीती व निरीक्षण करून त्यांचे पर्यावरणीय महत्त्व याबाबत छात्रांना माहिती दिली. दुपारी स्नेह भोजन करून परतीच्या प्रवासावेळी बुदलमुख येथील शिल्पकार जयदीप साळवी यांनी पंचधातू, फायबर इतर पर्यावरण पूरक घटकांपासून तयार केलेल्या वेगवेगळे प्राणी, पक्षी, महनीय व्यक्ती व गणपती मुर्तींची पाहणी केली. साळवे यांनी छात्रांना सविस्तर माहीती दिली. त्याच गावातील नागरिक मारुती आनंदा सारंग यानी सर्वांना सरबत देवून हा उपक्रम छात्रांसाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. उपक्रम यशस्वी करण्याकरिता छात्रसेना विभाग प्रमुख मेजर डॉ.अशोक डोनर यांच्या मार्गदर्शनानुसार सार्जंट सानिका, भगत, मयुरी चौगुले, कॅडेट सलोनी जबडे, वैष्णवी चौगुले, आदेश जाधव व निरंजन पाटील यानी परीश्रम घेतले. उपक्रम यशस्वी करण्याकरिता कोल्हापूर येथील ५६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीतगोगिआ, सुभेदार मेजर रवळू बोकडे, प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे, संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. तृप्ती शाह, खजिनदार सुबोध शाह यांचे सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान

Spread the love  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *