चंद्रकांत तारळे; निपाणी पीकेपीएसची वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी निपाणी प्राथमिक कृषी पत्तीन संघाची स्थापना झाली आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊन त्यांची प्रगती साधली जात आहे. आता संघामध्ये अनेक बदल झाले असून विविध प्रकारचे व्यवहार करता येणार आहेत. जिल्हा बँकेत मार्फत मिळणाऱ्या कर्जाचा सभासदांनी लाभ घेऊन स्वतःसह संघाची प्रगती साधावी, अशी आवाहन संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत तारळे यांनी केले. निपाणी विविधउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी पतीने सहकारी संघाच्या वार्षिक सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले. माजी उपरानध्यक्ष सुनील पाटील यांनी प्रास्ताविकात संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
अहवाल वाचनात संस्थेचे सेक्रेटरी संजय वसेदार म्हणाले, संघाचे १ हजार ९८ सभासद, ५ कोटी ३१ लाखावर भाग भांडवल, ३४ लाखावर इतर निधी, १३ लाखावर इमारत निधी, १३ लाखावर इतर बँकेत शिल्लक, ५३० सभासदांना ३ कोटी ९५ लाखावर पीक कर्ज वितरण, १ कोटी ३१ लाखावर गुंतवणूक केले असून १३ लाख ९१ हजार रुपयेचा नफा झाला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे.
यावेळी शिवाजी खोत, सचिन कौंदाडे, जीवन घस्ते यांच्यासह संचालक सभासदांनी मनोगत व्यक्त केले. नूतन संचालकासह हलशुगरच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल महालिंगेश कोठीवाले यांचा सत्कार झाला.
सभेस संघाचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रकुडे, उपाध्यक्ष प्रवीण उर्फ विरु तारळे, संचालक गजानन सुतार, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, रवींद्र शेट्टी, सोमराया यमगर, मलगोंडा पाटील, महेश बागेवाडी, समीर बागेवाडी, शिवकांत चंद्रकुडे, अनिल पाटील, संजय मोळवाडे, रवींद्र चंद्रकुडे, अमर जडी, अरुण भोसले, सचिन कुंभार, रवींद्र कदम, मुकुंद सौंदलेकर यांच्यासह संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते. इराण्णा शिरगावे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक दीपक माने यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta