
निपाणी (वार्ता) : येथील मुरगुड रोडवरील सुरज हॉटेल जवळ असलेल्या प्रगती ट्रेडर्सच्या लाकडाच्या गोडाऊनला शॉर्टसर्किटने आग लागून लाकडी सामानासह संगणक असे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता सुमारास ही घटना घडली. तात्काळ अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत घटनास्थळासह अग्निशामक दलाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, हरीनगर मधील गोडाऊन मालक सचिन पटेल हे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गोडाऊन बंद करून घरी गेले होते. रात्री साडेदहा वाजता सुमारास गोडाऊनला आग लागल्याची माहिती नागरिकांनी त्यांना दिली. त्यानुसार त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत गोडाऊन मधील सुमारे एक लाख रुपयाचे लाकडी साहित्य जळून खाक झाले होते. अग्निशामक दलाचे वाहन आल्यानंतर ही आग अटक्यात आली.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे निरीक्षक ए. आय. रुद्रगौडर, जवान व्ही. एम. पट्टण, व्ही. एम. निर्मळे, व्ही. व्ही. नाईक, व्ही. एस. देवऋषी, बी. के. होनवाडे, पी. ए. कुंभार यांनी प्रयत्न केले.
Belgaum Varta Belgaum Varta