निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हास्पीटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, नी रीप्लेसमेंट आजारावर मोफत आरोग्य तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील रोटरी हॉल येथे होणार आहे
अनुभवी वैद्य डॉ. सारंग शेटे यांच्या मागदर्शनाखाली शुक्रवारी (ता.१५) सकाळी १० वाजल्या पासून दुपारी १ वाजेपर्यत सांधेदुखी, गुड्ङ्घेदुखी, कंबरदुखी, लिगामेन्ट इंजुरी, फ्रोजन शोल्डर, हाडांची झीज आणि ठिसुळता, हीप व नी रीप्लेसमेंट नंतरचे उपचार, संधीवात संबंधी आजारावर मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. तरी गरजुनी या शिबिराचालाभ घ्यावा, असे अवाहन के. एल. ई. संस्थेचे संचालक अमर बागेवाडी यांनी केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, खजिनदार श्रीमंधर होनवाडे, के.एल.ई.एस. रोटरी हेल्थ केअर सेंटरचे अध्यक्ष दिलीप पठाडे व रोटरी सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta