जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा
निपाणी (वार्ता) : खेळ आणि स्पर्धांच्या माध्यमातून एकमेकांविषयी आदर भावना तयार होते. बंधुभाव तयार होऊन नेतृत्वगुण वाढीस लागतात. खेळ हे मानवाला तनावातून मुक्त करण्याचे काम करत असतात, असे मत निपाणी गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथे आयोजित जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. ध्वजपूजन श्रीनिवास पाटील, ध्वजारोहण अरुण निकाडे, ज्योत प्रज्वलन वकिल संजय शिंत्रे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा शिक्षणाधिकारी एम. बी.सांगले, व्ही. के. सनमुरी, एस. बी. जोगळे, एस. एन. बुर्लट्टी, एस. आर. नोरजे, एस. वाय. एलहट्टी यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत आठ रेंज मधून ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. यावेळी बी. एस. पाटील, एम. एच. कटगेरी, अशोक माने, कुमार माळी, शिवाजी चौगुले, रोहित पाटील, सीताराम चौगुले, पी. एस. यादव, प्रशांत माळी, सुरेश ढगे, आदेश आबणे यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. टी. एम. यादव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta