Wednesday , December 10 2025
Breaking News

काँग्रेस सत्तेसाठी युवक काँग्रेसचे कार्य महत्त्वाचे

Spread the love

 

लक्ष्मणराव चिंगळे; चिकोडी जिल्हा युवक काँग्रेसची सभा

निपाणी (वार्ता) : पक्ष संघटना मजबूत असल्याने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार आहेत. त्यासाठी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. राज्यात काँग्रेस सत्ता येण्यासाठी युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. हे लक्षात घेऊन पुन्हा या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्यासह पक्ष संघटनेसाठी प्रत्येक मतदारसंघात पुन्हा जागृती करण्याचे काम सुरू असल्याचे मत चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केले.
चिकोडी जिल्हा काँग्रेस कार्यक्षेत्रातील निपाणी, चिक्कोडी, सदलगा, अथणी, कागवाड, रायबाग, कुडची, हुक्केरी या आठ विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सभा येथील शासकीय विश्राम धामात गुरुवारी (ता.१४) पार पडली. त्यावेळी चिंगळे बोलत होते. अध्यक्षस्थानी चिक्कोडी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष यल्लाप्पा शिंगे होते.
निपाणी भाग युवक काँग्रेस अध्यक्ष अवधूत गुरव यांनी स्वागत केले.
चिंगळे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी सोशल मीडिया, ट्विटरवर टीका केलेल्या युवकावर भाजपने घातलेले खटले मागे घ्यावेत. काँग्रेस सरकारच्या विविध महामंडळावर थेट संचालक म्हणून प्रामुख्याने युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी द्यावी. मुख्य काँग्रेस सोबत युवक काँग्रेसला समान संधी मिळावी. निवडणूक पूर्व असलेले संबंधाकडे दुर्लक्ष न करता ते दृढ करावेत. ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत पातळीवर कार्यकर्त्यांची कमिटी करून बांधणी व्हावी. काँग्रेसच्या पाच गॅरंटी यशस्वीपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राम वन व बापूजी सेवा केंद्रात भाजप कार्यकर्ते असलेल्या ठिकाणी सर्व समावेशक असलेल्या व्यक्तीकडे नव्याने जबाबदारी सोपवावी.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी युवक काँग्रेसची पूर्ण तयारी आहे. आठवड्याभरात ग्राम, ब्लॉक, जिल्हा आणि प्रभाग निहाय अशा सर्व पातळीवर सर्व कमिट्या निर्माण करण्यात येणार आहेत. संबंधित विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदार काँग्रेस पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची रचना केली जाणार आहे.
यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, युवा उद्योजक रोहन साळवे, सुजय पाटील, केपीसीसी युथ काँग्रेस प्रवक्ते राहुल माचकनुर, जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष रोहित यादव, अक्षय वीरमुख, जनरल सेक्रेटरी प्रमोद पाटील, महादेव कवलापुरे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतीक शहा, ग्रामीण युवा अध्यक्ष अवधूत गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस अमोल बन्ने, प्रशांत अपराज, अनिल आडके, नागेश बन्ने यांच्यासह आठ विधानसभा मतदार संघातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *