निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्या निमित्त येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी (ता.१४) महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
प्रारंभी बसवप्रभूस्वामी यांच्या उपस्थितीत डॉ. महेश ऐनापुरे व ज्योती ऐनापुरे दाम्पत्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. बसवप्रभू स्वामी, हालशुगर संचालक महालिंग कोठीवाले यांच्या हस्ते माजी सभापती सुनील पाटील, रवींद्र कोठीवाले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसाद काहीलीचे पूजन झाले. व भाविकांचे श्रावण महिन्यात निरंतरपणे सुरू असलेल्या नाम जप, यज्ञ, पालखी सोहळा, नित्य पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांची यावेळी सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत तारळे, रवींद्र शेट्टी, सुरेश शेट्टी, प्रमोद पणदे, सदानंद चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, विजय चंद्रकुडे, इराण्णा शिरगावे, माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, वज्रकांत सदलगे, महेश दिवाण, सदानंद चंद्रकुडे, गजानन वसेदार, संजय मोळवाडे, मल्लिकार्जुन गडकरी, हालशुगर संचालिका गीता पाटील, सुलोचना पाटील, उपनगराध्यक्षा नीता बागडे, नगरसेविका अरुणा मुदकुडे, सोनाली उपाध्ये, विभावरी खांडके, वर्षा भोपळे, मंगल भालेभालदार, माधुरी चंद्रकुडे, स्नेहल चंद्रकुडे यांच्यासह महादेव देवस्थान ट्रस्ट कमिटी, गणेश मंडळ, एसपी ग्रुप, निलंबिका महिला मंडळ व भावीक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta