मंडल पोलीस निरीक्षक तळवार; कारवाईचा बडगा उगारणार
निपाणी (वार्ता) : यंदाचा गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर गावागावांत मूर्तीवर अखेरचा हात फिरविला जात आहे. उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीनिर्मितीसह प्रतिष्ठापना करण्यास जिल्हा प्रशासनाने यंदाही पूर्णपणे बंदी घातली आहे. शिवाय डॉल्बीही हद्दपार करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबत जनजागृती केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट गुन्हा दाखल करून कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी दिली.
दरवर्षी पोलिस ठाण्यातर्फे सार्वजनिक मंडळांना उत्सवकाळातनियम व अटी घालून दिल्या जातात. पण त्यांचे पालन होत नव्हते. त्यामुळे यंदा सर्व नियम व अटींची अंमलबजावणी करणाऱ्या मंडळांनाच मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी दिली जाईल. पीओपी मूर्तीमुळे जलस्रोतांसह पर्यावरणाची हानी होत असल्याची बाब गांभीयनि घेऊन ‘परिसर कायदा १९८० नुसार या मूर्तीवर पूर्णपणे बंदी घातलीआहे. त्यामुळे बहुतांश मूर्तिकारांनी ‘पीओपी ऐवजी शाडू मूर्तीवर भर दिला आहे. परगावाहून प्लास्टरच्या मूर्ती येऊ नये त्यासाठी शहराच्या चारही बाजूला नाकाबंदी करण्यात येणार आहे.
मिरवणूक अथवा मंडपाच्या ठिकाणी आणि मिरवणुकीत डॉल्बी मोठ्या आवाजाची वाद्ये लावल्यास ‘कर्नाटक पोलिस कायदा १९६३ नुसार साहित्य जप्तीसह थेट अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.
——————————————————————–
‘यंदाही पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने पीओपी मूर्ती व डॉल्बीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. नियमांचे पालन करून शांततेने गणेशोत्सव पार पाडावा लागणार आहे.
——————————————————————–
‘यंदा गणेशमूर्ती तयार होण्यापूर्वीच मूर्तिकारांची यादी करून त्यांना पीओपी मूर्ती न बनविण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही सूचना दिल्या आहेत. तरीही मूर्ती बसविल्यास त्यांच्यावर कारवाई करून दंडही आकारला जाणार आहे.’
– जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta