योहान इम्यानुअल; समाजाच्या विकासासाठी निर्णय
निपाणी (वार्ता) : ख्रिश्चन जागा खरेदी करत असतांना सरकारी नियमांनुसार खरेदी- विक्रीच्या सर्व नियमांचे पालन केले आहे. याला विरोध करणाऱ्यांनी आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे आमची कोणीही चुकीच्या पध्दतीने बदनामी करू नये, असे आवाहन शहा ए.व्ही. इन्फ्राचे अभिषेक शाह यांनी केले. शनिवारी (ता.१६) आयोजित बैठकीत ते बोलत होते.
युनाईटेड चर्च ऑफ नॉद इंडिया ट्रस्ट असोसिएशनचे अध्यक्ष योहान जी. इम्यानुअल म्हणाले, ख्रिचन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निपाणीतील जागेची विक्री करण्याचा ठराव सर्व समाजातील प्रमुख ट्रस्टींच्या बैठकीत करण्यात आला होता. त्यानुसार कायदेशीरपणे नियमांनुसार या ७.३४ एकर जागेची विक्री जागा ४ कोटी रूपयांना विक्री केली. सर्व संमतीनेचे १३१/बी या जागेचा विक्री व्यवहार पूर्ण केला आहे.
सन १९२० ला आप्पासाहेब खोत परिवाराकडून बोर्ड ऑफ फॉरेन मिशनरी यांनी खरेदी केली होती. त्यानंतर १९२४ देशातील ख्रिश्चन समाजाच्या सर्व जागा ११ ट्रस्टच्या नावे इंग्रजांनी हस्तांतरीत केल्या होत्या. १९६७ पासून युसीएनआयटीएच्या नावे हस्तांतरीत झाली आहे.
यावेळी अतुल सोनुले, अविनाश हेगडे, विशाल जगताप, वरूण शाह, सुरेश साळुंखे, विशाल जयस्वाल, देवधन हेगडे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta