अदृश काडसिद्धेश्वर स्वामी; समाधी मठात श्रावण मासाची सांगता
निपाणी (वार्ता) : हिंदू धर्म भारतीय संस्कृती ही जगाला आदर्श देणारी संस्कृती आहे. ही संस्कृती नेहमीच दुसऱ्याला देण्याचे सांगते. आपले साधू संत हे जगा आणी जगू द्या, असे सांगत असतात. मठ मंदिरे हे हिंदूचे भक्ती आणि शक्ती केंद्र आहेत. प्रत्येकाने आपल्या घरापासून भारतीय संस्कृतीचे आचरण करावे, असे आवाहन कणेरी मठातील अदृश्य काड सिद्धेश्वर महाराजांनी केले.
येथील विरूपाक्षलिंग समाधी मठात श्रावण समाप्ती निमित्त गुरुआराधना कार्यक्रम, पालखी सोहळा, अध्यात्मिक प्रवचन, आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी यावेळी महाराज बोलत होते.
आमदार शशिकला जोल्ले यांनी, निपाणी परिसरावर कोणतेही संकट आले तर प्राणलिंग स्वामींच्या मार्गदर्शनाखाली समाधी मठाच्या माध्यमातून सर्व परीने सहकार्य केले जाते. यांची आनभुती जनता घेत आहे. समाधी मठ हा भविष्यात कर्नाटक राज्यामध्ये आदर्श घडवेल, असे सांगितले.
प्राणलिंग स्वामी यांनी, निपाणी परिसरात धार्मिक लोक व भक्तमंडळी असून त्यांच्या सहकार्यातून हा मठ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यासाठी वीरूपाक्षलिंग समाधी मठ ट्रस्टचे योगदान लाभत असल्याचे सांगितले. यावेळी आत्माराम स्वामी, श्रध्दानंद स्वामीनींही आशीर्वचन दिले.
यावेळी श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठातर्फे महाप्रसाद व इतर उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या निपाणी परिसरातील नागरिकांचा स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे ट्रस्टी सुरेश शेट्टी, चंद्रकांत कोठीवाले, चिंतामणी वाळवे, वज्रकांत सदलगे, दयानंद शिप्पुरे, विठ्ठल धन्याळ, गंगाधर पाटील, महालिंग कोठीवाले, म्हाळू हेगडे, गजेंद्र तारळे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, रवींद्र शेट्टी, डॉ. सी. बी. कुरबेट्टी, माजी सभापती सुनील पाटील, वैशाली पाटील, गीता पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta