उत्तम पाटील; ४८वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावत असले तरी ग्रामीण भागात अलीकडच्या काळात गाय, म्हैस पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दूध उत्पादनात घट होत चालली आहे. अशा परिस्थितीत अरिहंत दूध उत्पादक संघाने चांगल्या प्रकारे दूध संकलन करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. अहवाल सालात या संघाला ३ लाख ९४ हजारावर नफा झाल्याची माहितीविविधोद्देशय प्राथमिक ग्रामीण कृषी संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. संघाच्या ४८व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्तम पाटील, म्हणाले लंपी, लाळ खुरकत अशा विविध रोगराईच्या काळात पशुपालक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जनावरांना मोफत औषधोपचार केले आहेत. या पुढील काळातही शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहे. संघाचे ४१४ सदस्य, १ लाख ८१ हजाराचे भाग भांडवल, १७ लाख ९६ हजारावर निधी, ३७ लाख ८६ हजारावर ठेवी, २८ हजारावर हाती शिल्लक, १ लाख ९३ हजारावर इतर बँकेमध्ये शिल्लक, बँक खाती : अहवाल वर्षाच्या शेवटी एकूण बँकांमध्ये रु. १,९३,४०७.७६, ११ लाख ९५ हजारावर गुंतवणूक, ४ लाख ७६ हजारावर कर्ज वितरण केले आहे.
व्यवस्थापक बाहुबली कवटे यांनी, अहवाल सालात वर्षासाठी एकूण म्हशीचे दूध २ लाख २५ हजार लिटर आणि गायीचे दूध ६१ हजार, ८५० लिटरवर संकलन केले आहे. दिवाळी दरम्यान दूध उत्पादकांना ५ लाख ६ हजारावर लाभांश वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष सिकंदर अपराज, संचालक उत्तम पाटील, मायगोंडा पाटील, शितल हवले, रमेश माळी, रावसाब पाटील, हिराचंद चव्हाण, बाळासाहेब मडिवाळ, भारती सावरवाडे, वैशाली बुलबुल, जयपाल कोरवी यांच्यासह संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.